महादेव हिले
प्रतिनिधी मुंबई क्राईम पेज न्युज
ठाणे १२ ऑगस्ट:- गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक - २०२०’ पदकाने सन्मानित ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून केलेल्या गुन्ह्याचा उत्तमरीत्या तपास केल्याबद्दल ठाणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी(तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक) किसळ गवळी यांना केंद्रीय गृह खात्याने ‘केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२०’ पदकाने सन्मानित केले. सदर पदक जाहीर झाल्याबद्दल ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध - १) किसळ गवळी यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना किसन गवळी यांनी केलेला तपास...सन २०१० सांगली जिल्हा पोलीस दलातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर किसन गवळी कर्तव्य बजावत असताना एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपीने तिचा खून केला. या प्रकरणी (गु. र. क्र. ६३/२०१०) भादंवि कलम ३७६(फ), ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण भाग असल्याने कुठल्या प्रकारे तांत्रिक माहिती हाती नसतानाही अतिशय उत्तमरीत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन गवळी यांनी पोलीस पथकासह गुन्ह्याची उकल करून आरोपी राजू पासवान गुन्हा घडला त्यावेळी वय २२, रा. बिहार याला बेड्या ठोकल्या दरम्यान, या गुन्ह्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी (पोलिसांनी केलेला तपास) साक्षपुरावे सांगली जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले. सदर पुरावे ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायालयाने ६ नोव्हेंबर २०१२ रोजी राजू पासवान याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. आरोपी राजू पासवान याने या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र उच्च_न्यायालयानेही २०१३ साली त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. दरम्यान, आरोपी राजू पासवान याने सर्वोच्च_न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरुद्ध आव्हान केले असता १७ जानेवारी २०१९ रोजी या गुन्ह्यात ३० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली या गुन्ह्याच्या संदर्भात आणखी उत्तम बाब म्हणजे गुन्हा घडल्यानंतर सांगलीकरांनी पोलिसांच्या अर्थात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन गवळी यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवला अन् संयम बाळगून कुठल्याही प्रकारे मोर्चे अथवा आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांविरुद्ध आंदालने केली नाहीत. सांगलीकरांचा हाच संयम व पोलिसांप्रति विश्वास तपासात कामी आला अन् पोलिसांनी उत्तमरीत्या तपास पूर्ण केल्यामुळे आरोपी राजू पासवान याला शिक्षा झाली याचीच दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेऊन सध्या ठाणे पोलीस दलात कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध - १) किसन गवळी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२० पदकाने सन्मानित केले. या सन्मानाची दखल घेऊन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Comments