महादेव हिले
मुंबई क्राईम पेज न्युज ठाणे
ठाणे दि ४ ऑक्टोबर : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कोरोनावर मत केली असून रविवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शिंदे यांनी कोरोना काळात संकटात सापडलेल्या नागरिकांना खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून मदत केली नागरिकांना अन्नधान्य वाटप,रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले,कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळवा म्हणून स्वतः पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन नागरिकांची विचारपूस केली,कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतःला झोकून दिले होते.याच दरम्यान नागरिकांची सेवा करताना त्यांना कोरोनाची लागण झाली.कोरोनाची लागण झाल्यापासून गेले १० ते १२ दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.अखेर त्यांनी कोरोनावर मत केली असून रविवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले .
Comments