ठाणे :ठाणे व आजूबाजूच्या परिसरात चारचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर व पोलीस सह आयुक्त मधुकर पांडे यांनी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या बाबत सूचना देऊन कारवाई करण्यास सांगीतले होते , त्याच दरम्यान दिनांक 10/10/2018 रोजी व्रुन्दावन सोसायटी येथे राहणारे उद्धव नाना साठे यांची पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप चोरीला गेल्याची तक्रार राबोडी पोलीस स्टेशन दाखल झाली होती .
राबोडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा 379 प्रमाणे या बाबत गुन्हा दाखल झाला होता , त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरिक्षक महेश जाधव करत होते ,सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणअंती आपल्या पथकास पुण्याला जाऊन त्यांनी चोरीला गेलेली महेंद्र बोलेरो पिकअपचा शोध लाऊन ती ताब्यात घेतली , यात अजुन गाड्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्या मुळे त्यांनी त्याची तत्काळ माहीती अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांना दिली , त्यांनी दिलेल्या सूचनेवरून वेगवेगळे पांच पथक तयार करून वाहन चोरणारे , चोरीचे वाहान खरेदी करणारे , चोरीच्या वाहानामध्ये इंजिन व चेसीस मध्ये फेरफार करणारे , नागालँड येथुन वाहानाचे आरसीबुक बनवणारे , बेळगाव कर्नाटक , राजस्थान येथे चोरीचे वाहान विकणारे एजंट अशा एकूण 9 जणांना अटक करण्यात आली , संदीप मुरलीधर लागू राहणार मुंबई महाराष्ट्र , सादिक मेहबूब खान मुल्ला राहणार बेळगाव कर्नाटक , अल्ताब अब्दुलगणी गोकाक राहणार बेळगाव कर्नाटक , विनीत रतन माधीवाल राहणार मुंबई महाराष्ट्र , मांगीलाल शुभनाराम जाखड नागौर राजस्थान , जावेद उर्फ बबलू मख्तार खान प्रतापगड उत्तर प्रदेश , अल्ताब एक्बाल कुरेशी राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश , मोहम्मद युसूफ नईम खान प्रताप गड उत्तर प्रदेश अशा या आरोपींची नाव आहेत , त्यांच्या कडे सखोल चौकशी केली असता आरोपींकडून 170 चोरीच्या वाहनांची माहीती पोलीसांना मिळाली , त्यांची तांत्रिक माहीती मिळवुन त्यातील 105 वाहान चोरीचे गुन्हे उघडकीस आले , त्यातील एकूण 80 वाहाने जप्त करण्यात आली त्या मध्ये 69 महिंद्रा पिकअप , 8 महिंद्रा बलेरो , 1 होंडा सिटी , 1 वेर्णा , 1 ब्रीझा असा सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये किमतीची वाहाने पोलीसांनी जप्त केली .
गाड्या चोरणाऱ्या या टोळी मध्ये संदीप मुरलीधर लागू हा त्यांचा मास्टर माइंड असुन दुसरा आरोपी विनीत रतन माधीवाल याची आई बारबाला आहे व तिचे सबंध संदीप मुलारीधर लागू याच्या बरोबर होते , तिच्या मार्फत संदीप लागूची इतर आरोपींबरोबर ओळख झाली , ह्या सगळ्यांची मिळुन संदीप लागू याने गाड्या चोरणारी आन्तराज्यीय टोळी बनवली , ही टोळी महाराष्ट्रा मध्ये ठाणे शहर , ठाणे ग्रामीण , मुंबई शहर , नवी मुंबई , पालघर , रायगड , पुणे , अहमदनगर , नाशिक , गुजरात या ठिकाणाहून वाहाने चोरी करून पुणे येथे एका गोडाऊन मध्ये ठेवत असत , त्यानंतर त्या गाड्यांचे चेसीस व इंजिन नंबर यात बदल करून नागालँड येथुन वाहनांचे आरसी बुक बनवुन ते वाहान कर्नाटक व राजस्थान मध्ये एजंट मार्फत लोकांना विकत असत , अशी माहीती सह आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली तसेच त्यांनी लोकांना आव्हान केले आहे की सार्वजनिक रस्त्यावर अथवा निर्जन स्थळी आपले वाहान पार्किंग करू नये , जी .पी एस सिस्टिम तसेच तस्तम यंत्रणा गाडीमध्ये बसवण्यात यावी , शक्यतो सीसीटीव्हीच्या निगराणी मध्ये आपले वाहान पार्क करण्यात यावे , गाडीमध्ये स्टेअरिंग लॉक आणि अलार्म सिस्टिम बसवण्याची व्यवस्था करावी

Comments