( यातील कवी जगाच् भल् करता करता चक्रव्युहात अडकतो तेव्हा कोणी ही त्याच्या बाजुने ऊभा रहात नाही....तेव्हा त्याला ऊमग लेल् सत्य या कवीतेत सांगण्याचा प्रयत्न.)
शब्द:स्वामी-परमात्मा
राधा- आत्मा
स्व: मी कोण
नाम: गुरुमंञ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*कोणीच् कोणाच् नसत्*
स्वामी सांगे राधाला दिसत् तस् नसत् ,
सांगुण थकलो जनाला तरी ही कळत नसत् ।
खाली हात येऊन तसच जायच् असत् ,
एक मात्र सत्य असत् *कोणीच कोणाच नसत्* ।
मी माझ म्हणत-म्हणत नाती गोती जपली,
"स्व" ला ओळखण्याची संधी मी कधीच नाही घेतली ।
सगे- सोयरे,आप्त - सखे हे माझे म्हणुनी आयुष्य वेचल् ,
"चक्रव्युहा"त जेव्हा आडकलो,
*तेव्हाच कळल् कोणीच कोणाच् नसत्* ।।
वीचार कधीच केला नाही 'वाल्या'च्या त्या कहानीचा ,
"अभीमन्यु" सारखी गत झाली, पर्याय होता मृत्युचा ।
मृगजळाच्या मागे लागुन जिवन संपुन गेल् ,
श्वास ऊरला शेवटचा अन् तेव्हाच *कळल् कोणीच कोणाच नसत्*।।।
आठवण झाली त्या "स्वामीं" ची त्यानी दिलेल्या त्या "नामा" ची.
पाश तुटले स्वजनांचे, महती कळली "दशद्वांरा"ची ।
कोड् सुटल् "चक्रव्युहा"च, चुकुन कळल् अन् कळुन चुकल् ।
जगात फक्त "नाम"च आपल् आसत् बाकी *कोणीच कोणाच नसत्* ।।।।
🙏
*करौली सरकार की जय*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
कवी
*धनवेद*
Comments