कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडल्याने जाधव अद्यापही बेशुद्ध,उपायुक्त अशोक दुधे देवदुता समान आले मदतीला.

उपायुक्त अशोक दुधे देवदुता समान आले मदतीला.

हवालदार राजेंद्र जाधव यांच्यासाठी प्रार्थना करा

* कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडल्याने जाधव अद्यापही बेशुद्ध

*जाधव यांना आर्थीक मदत करण्याचे आवाहन

     ताडदेव वाहतूक चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार (बक्कल नं. 34519) राजेंद्र जगन्नाथ जाधव (49, रा. बीडीडी चाळ क्र. 68,  वरळी, मुंबई ) हे सोमवारी नाना चौक येथील पाईंटवर कर्तव्यावर जात होते. भरदुपारच्या उन्हात अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी काही अंतरावर उभ्या असलेल्या ताडदेव पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅन क्र. 1 मध्ये कर्तव्यावर असलेल्या अंमलदारांनी तात्काळ जाधव यांन पोलीस मोबाईल व्हॅनमधून परिसरातील भाटिया रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून जाधव यांची प्रकृती गंभीर आहे. अद्याप ते शुद्धीवर आले नाहीत.
    धक्कादायक बाब म्हणजे जाधव यांचा एकूलता एक 6 वर्षांच्या मुलाचीही इंजोप्लॅस्टिक सर्जरी झाली आहे. एक दिवसाआड त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन द्यावे लागते. त्यासाठी 750 रुपये खर्च येतो. असे असताना अचानक जाधव यांच्या बाबतीत असे झाले. जाधव यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जाधव यांना सद्या प्रार्थनेची व पैशांची गरज आहे. आतापर्यंत दीड लाख रुपयांहून अधिक खर्च झालेला आहे.
   
 
जाधव यांची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे उपायुक्त अशोक दुधे मदतीसाठी देवदुता प्रमाणे धावून आले. त्यांनी आतापर्यंत झालेल्या सर्व रुग्णालयीन खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच रुग्णालयात दोन अंमलदारांना मदतीसाठी तैनात केले आहे.  जाधव यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या उपायुक्त अशोक दुधे यांना "पोलीस मित्र"व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चा सलाम!
     मंडळी, जाधव हे वाहतूक शाखेत इमानदारीने कर्तव्य बजावत होते. त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी व त्यासाठी आपापल्या परीने प्रार्थना व आर्थिक मदत करा, हे "पोलीस मित्र" या नात्याने तुम्हा सर्वांना आवाहन करत आहोत.

    जय हिंद!

मा श्री सिद्धार्थ जाधव (उपाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य)

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .