माँ तुमे सलाम ! तुने इतना प्यारा सुपुत्र PSI श्री.सूर्यवंशी,देश को दिया !

पोलीस हा शब्द ऐकला की काही जणांच्या भुवया उंचावल्या जातात,पण हेच पोलीस त्यांचे दिवस-रात्र ,सण-वार सोडून आपलं रक्षण करत असतात,ह्याचाच प्रत्यय दिनांक २१-१०-२०१९ रोजी आला,विधानसभेच्या मतदानाचा दिवस ठिकाण चंदारामजी शाळा मलबार हिल विधानसभा येथे सकाळी ७.३० सुमारास एक प्रकार घडला,मतदान चालू असताना EVM मध्ये काही तांत्रिक बिघाड झाली तेथील मतदान केंद्रावरील अधिकारी श्री.जयंत नामदेव डोले EVM मशीन  ठीक करण्याचे प्रयत्न करीत असताना ती चालू होत नव्हती त्यामुळे ताण वाढल्यामुळे त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला तेव्हा बदोबस्तावर हजर असणारे PSI श्री.सूर्यवंशी,गिरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता परस्थिती पाहताच लगेचच  PSI सुर्यवंशी साहेबानी स्वतःच्या खांद्यावर उचलून मतदान केंद्रावरुन रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांना गाडीत झोपवीले. सर जे.जे. रुग्णालयात नेताना त्यांना गाडीतच त्यांनी पम्पिंग ट्रीटमेंट दिली आहे. कर्त्यावरील डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना ICCU वार्ड नंबर 4 मध्ये ऍडमिट केले. डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली. त्यावेळी सूर्यवंशी साहेबांच्या कामगिरीचे कौतुक केले. आता रुग्णाची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे.रुग्णाच्या नातेवाईकांनी सुर्यवंशी साहेबांचे आभार मानले. *असे कर्तबगार पोलीस आमच्या हद्दीत असल्याचा आम्हाला गर्व आहे*👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .