Skip to main content

माननीय श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे जी !! मी डोंबिवलीकर बोलतोय !!

प्रति,
 माननीय श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे.
 मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

 महोदय,
 मी व माझे कुटुंबीय डोंबिवली येथील एमआयडीसीमधील आर आर हॉस्पिटल मध्ये कोरोना संसर्ग झाल्यामुळे ऍडमिट आहोत. आम्ही इथून जिवंत बाहेर निघू की आमच्या सर्वांच्या डेड बॉडीज इथून जातील? ही चिंता आत्ता आम्हाला सतावू लागली आहे. आपण या जिवघेण्या प्रसंगातून आम्हाला इथून जिवंत व सुखरूप बाहेर काढाल अशी अपेक्षा बाळगतो.
 महोदय,
मी, संजय हेंद्रे चौधरी वय 55  वर्षे (राहणार, 001, रूद्राक्ष अपा., तळ मजला, सुर्या हॉस्पिटल मागे, सागर्ली गांव, डोंबिवली पूर्व) गेल्या तीस वर्षापासूनचा शिवसैनिक. माझी पत्नी सौ स्वाती संजय चौधरी वय 45 वर्षे ही डोंबिवलीतील मानपाडा पथावरील आयकॉन या हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. सदर हॉस्पिटल मध्ये कोरोना बाधित पेशंटवर इलाज करताना तिलादेखील कोरोना विषाणूंची बाधा झाल्यामुळे माझ्या पत्नीला 14 एप्रिल रोजी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे कल्याण-शीळ रोडवरील निऑन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. आमच्या घरातील उर्वरित सर्वांची 15 एप्रिल रोजी कोरोना टेस्ट घेवून ती पॉझिटीव्ह आल्यामुळे उर्वरित सर्व कुटूंबियांना (मी स्वत:55 वर्षे, माझा मुलगा 20 वर्षे, मुलगी  17 वर्षे व सासुबाई 70  वर्षे) 18 एप्रिल 2020 रोजी कल्याण-शीळ रोड वरील निऑन हॉस्पिटल येथे उपचारासाठी कोरंटाईन करण्यात आले होते परंतु काल गुरूवार दि. 23 एप्रिल रोजी मध्यरात्री ठिक 1:30 वाजता अचानक आम्हाला डोंबिवली एमआयडीसी मधील आर आर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. आम्हाला आर आर हॉस्पिटल येथे ऍडमिट करणार हे ऐकल्यावर खरंतर आम्हा सर्व कुटुंबीयांना आनंद झाला होता कारण आर आर हॉस्पिटल हे सर्व सोयीसुविधांनी स्वयंपूर्ण असलेले अतिशय उत्तम प्रकारचे हॉस्पिटल आहे तसेच हे हॉस्पिटल आमच्या घराशेजारी देखील आहे.
 पण काल मध्यरात्री इथे ॲडमिट झाल्यावर सदरचे हॉस्पिटल महापालिका प्रशासनाच्या ताब्यात गेल्याने इथले चित्र बदलून गेल्याचे आम्हाला पहावयास मिळत आहे.
 साहेब, इथे आल्यापासून आम्हाला पिण्याचे शुध्द पाणी देखील उपलब्ध होत नाही. याठिकाणी पेशंटला पाणी पिण्यासाठी फक्त एकच ग्लासची व्यवस्था आहे. सदर घाणेरड्या एकाच ग्लासातूनच आम्ही सर्व पेशंट पाणी पीत आहोत. इथे आल्यापासून रात्रभर घाबरून माझी दोन्ही मुलं रडत आहेत. येथे जेवणाची वेळ दुपारी 2:30 वाजताची आहे, काही पेशंटला झोपण्यासाठी बेड नाही, पंखा नाही, राहण्याची कोणतीही व्यवस्था नाही. प्रत्येक पेशंटला फक्त एक युरीन पॉट देण्यात आलेले आहे. संडास- बाथरूमच्या बाहेर हात धुण्यासाठी साबण नाही किंवा अंघोळीसाठी देखील साबणाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. काल या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून आम्हाला कोणत्याही प्रकारचे औषध हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. पेशंटचे एक्स-रे काढण्यासाठी सर्व पेशंटला मिळून एकच ड्रेस हॉस्पिटल कडून देण्यात येतो खरंतर ही बाब सर्वच पेशंटच्या दृष्टीने जीवघेणी आहे.
आम्ही पूर्वी बघितलेले सोयी सुविधांनी स्वयंपूर्ण असलेले आर आर हॉस्पिटल हे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात गेल्यामुळे पूर्णतः बकाल व दुर्दशापूर्ण बदलून गेलेले आहे.
तब्येतीने चांगले असलेले व सिरीयल असलेले सर्व प्रकारचे पेशंट एकाच ठिकाणी अगदी कोंबण्यात आले आहेत. या ठिकाणी आत्ताच्या घडीला एकूण 18 पेशंट आहेत त्यापैकी अंदाजे दोन-तीन जण सिरीयस असावेत असे मला वाटते. उर्वरित सर्व जण बऱ्यापैकी अवस्थेत आहेत परंतु ही भयानक परिस्थिती काही दिवस अशीच चालू राहिली तर कदाचित आम्ही सर्वच्या सर्व पेशंट दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 या गंभीर विषयासंदर्भात मी, या ठिकाणी काम करत असलेल्या स्टाफला संपर्क केला असता महापालिका प्रशासन याकडे अजिबात लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणन आहे.
 या निवेदनाद्वारे माझी, माझ्या कुटूंबियांची आणि माझ्या सोबत या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या सर्व कोरोना पेशंटची आपणास नम्र विनंती आहे की महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री या नात्याने आपण या प्रकरणात गंभीरतेने लक्ष घालून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन आम्हाला या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये लागणारी आरोग्य विषयक प्राथमिक सोयी सुविधा व कोरोना विषयाशी संबंधित औषध साहित्याचा पुरवठा मिळवून देऊन आम्हा सर्वांना पुनश्‍च: एकदा कोरोनामुक्‍त करून देवून जीवनदान द्यावे.
 ही नम्र विनंती.
आपले विश्र्वासू
🙏
संजय हेंद्रे चौधरी, कुटूंबिय आणि समस्त कोरोनाग्रस्त पेशंट.

Comments

Popular posts from this blog

पहले सेक्स की कहानी, महिलाओं की जुबानी.

क्या मर्द और क्या औरत, सभी की उत्सुकता इस बात को लेकर होती है कि पहली बार सेक्स कैसे हुआ और इसकी अनुभूति कैसी रही। ...हालांकि इस मामले में महिलाओं को लेकर उत्सुकता ज्यादा होती है क्योंकि उनके साथ 'कौमार्य' जैसी विशेषता जुड़ी होती है। दक्षिण एशिया के देशों में तो इसे बहुत अहमियत दी जाती है। इस मामले में पश्चिम के देश बहुत उदार हैं। वहां न सिर्फ पुरुष बल्कि महिलाओं के लिए भी कौमार्य अधिक मायने नहीं रखता।                                                        महिला ने कहा- मैं चाहती थी कि एक बार यह भी करके देख लिया जाए और जब तक मैंने सेक्स नहीं किया था तब तो सब कुछ ठीक था। पहली बार सेक्स करते समय मैं बस इतना ही सोच सकी- 'हे भगवान, कितनी खु‍शकिस्मती की बात है कि मुझे फिर कभी ऐसा नहीं करना पड़ेगा।' उनका यह भी कहना था कि इसमें कोई भी तकलीफ नहीं हुई, लेकिन इसमें कुछ अच्छा भी नहीं था। पहली बार कुछ ठीक नहीं लगा, लेकिन वर्जीनिया की एक महिला का कहना था कि उसने अपना कौमार्य एक ट्रैम्पोलाइन पर खोया। ट्रैम्पोलाइन वह मजबूत और सख्त कैनवास होता है, जिसे ‍स्प्रिंग के सहारे कि

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 बिजली के समस्या के लिये आप Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 पर अपनी बिजली से सबंधित शिकायत कर सकते है। या Torrent Power ऑफिस जाकर भी अपनी शिकायत दर्ज करा सकते है। या उनके ईमेल id पर भी शिकायत कर सकते हो। To,                            Ass.Manager Torrent Power Ltd चद्ररगन रेसिटेंसी,नियर कल्पतरु जेवर्ल्स,शॉप नंबर-234, दिवा ईस्ट । consumerforum@torrentpower.com connect.ahd@torrentpower.com

#महाराष्ट्र के मा.मुख्यमंत्री #एकनाथ शिंदे जी,मेरा बेटे #कृष्णा चव्हाण #कर्नाटक से #ठाणे रेलवे पर स्टेशन आते वक़्त लोकल रेल्वे से उसका एक्सीडेंट में मौत होकर 3 साल गुजर जाने पर भी आज तक इस ग़रीब माता पिता को इंसाफ नही मिला हैं !!

#महाराष्ट्र के मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी,मेरा बेटे कृष्णा चव्हाण #कर्नाटक से ठाणे रेलवे स्टेशन पर आते वक़्त लोकल रेल्वे से उसका एक्सीडेंट में मौत होकर 3 साल गुजर जाने पर भी आज तक इस ग़रीब माता पिता को इंसाफ नही मिला हैं !! आज तक किसी भी रेलवे के तरफ़ से कोई अधिकारी मेरे बेटे के ट्रेन एक्सीडेंट लेकर या कोर्ट केस से संबधित कोई भी इनफार्मेशन मुझे नही दी हैं. मेरे बेटे के मौत को लेकर कोई भी रेलवे डिपार्टमेंट से कानूनी लीगल मदत आज तक नही मिली हैं. #कृष्णा पुनिया चव्हाण को इंसाफ दिलाने के लिए जनता इस न्यूज़ पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेयर करें और साथ हीं कमेट्स बॉक्स में अपनी राय रखे !!