माननीय प्रशासक
अन्न व भेसळ
आज मुंबईसह महाराष्ट्रात आणि सम्पूर्ण देशात कोविड सारख्या रोगाने थैमान घातले असताना सम्पूर्ण मुंबईत प्रसिद्ध असलेल्या ह्या मुजोर गौरीशंकर छितर्मल मिठाईवला याने रात्रभर तुंबलेल्या पाण्याने दुकानातील शोकेसेस स्वच्छ करत होता ह्याच शोकेसेस मध्ये मिठाई व अन्य पदार्थ ग्राहकांना विक्रीसाठी ठेवतो व हेच पदार्थ विभागातील नागरिक आणि मुंबईतील जनता चवीने खाते वारंवार एफ दक्षिण विभाग येथील आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार करूनही ह्या विभागाचे सम्बधित सहाय्यक आयुक्त आणि अधिकारी दुर्लक्ष करत आले त्यांना पुरावे हवेत
आपणांस पाठवलेली व्हिडिओ क्लिप ही आजची दिनांक 23 सप्टेंबर 2020 ची सकाळी काढली आहे
अजून ह्या मुजोर दुकांनदारा विरुद्ध किती पुरावे प्रशासनाला द्यायचे विभागातील नागरिकांचे जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का ?
माझी आपणांस विनंती आहे आपण सध्या चाललेल्या रोग परिस्थिती चा गांभीर्याने विचार करून ह्या उपरोक्त दुकान मालक व कर्मचाऱ्याने विरुद्ध कडक कारवाई करून दुकान सील करावे व जिथे हे पदार्थ बनवितात त्याची तातडीने पहाणी करावी म्हणजे सत्य जनतेसमोर येईल.
आपण कारवाई कराल ही अपेक्षा।
Mumbai Crime Page News
Cell No : 7977194366
धन्यवाद !
Comments