हल्लेखोर डोक्याला सम्पूर्ण बेंडेज गुंडाळून लगड़त आला,आहे ना राजकारणाची कमाल ?

                               जख्मी अनिकेत पवार 
Report By
प्रदीप मिस्त्री !!

पोलीस ठाण्यातील आणि तेथील आवारातील फुटेज वरून हे स्पष्ट होऊ शकते.

 काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या काही तरुण मुलांनी पवार हाऊस, सुखसम्पदा सोसायटीच्या बाजूला, भांडुप गाव(पूर्व), मुंबई ४०००४२, या घराच्या कंपाऊंड मध्ये शिरून घराच्या दारात बसलेल्या अनिकेत रमेश पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

सदर घटनेची माहिती मिळाली तेंव्हा घटणस्थळी धाव घेतली असता कळाले की .

१४,१५ जणांनी अनिकेत पवार यांच्या वर घरात शिरून प्राणघातक हल्ला केला मात्र गलका ऐकून आजूबाजूचे लोक आणि अनिकेत ची आई रजनी रमेश पवार, तसेच बाजूला रहाणाऱ्या नातेवाईक  श्रीमती केशर महेंद्र दमामे ह्या धावत आल्या.

हल्ले खोरांनी त्यांनाही मारहाण केली. अनिकेत पवार आणि त्यांच्या सोबत त्यांच्या घराच्या पायरीवर गप्पा गोष्टी करत बसलेल्या   अनिकेतच्या कुटुंबीयांनी या हल्ल्याला प्रतिकार केला.

मात्र हल्लेखोरांनी अनिकेत यांचे डोके पेवर ब्लॉक ने डोक्यावर मारून फोडले होते त्यामुळे अनिकेत रक्त बंबाळ झाला होता तरीही अनिकेत यास खेचत ओढत मारत हल्लेखोरांनी कम्पाउंड च्या बाहेर नेले.

परंतु तेव्हड्यात गर्दी वाढली होती आणि इतर लोकांनी देखील पोलीस कंट्रोल ला कॉल करून  पोलिसांची कुमक मागवली.तसेच हल्लेखोरांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. असे सुत्रांनुसार कळते.

 आम्ही घटनास्थळी दाखल झालो तेंव्हा दोनतीन स्त्रीया हल्लेखोरांच्या नातेवाईक तेथे उपस्थित होत्या.

तेथे जमलेल्यांकडून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कळाले,  सदर घटना घडायच्या अर्धा ते पाऊण तास अगोदर रचना अपार्टमेंट२ च्या समोर  हल्लेखोरामुळे ट्रॅफिक जॅम झाली होती ,आणि अनिकेत पवार यांची सुद्धा गाडी त्या ट्रॅफीक मध्ये अडकली होती. तेंव्हा त्यांचा शाब्दिक वाद झाला होता. आणि ट्रॅफीक व्यवस्थित करून जो तो आपापल्या घरी निघून गेला होता.

मात्र अर्ध्या तासाने हल्लेखोर आपले अन्य १०-१५ साथीदार घेऊन अनिकेत पवार यांच्या  निवासस्थानी पोहोचला आणि अनिकेत पवार यांच्या वर प्राणघातक हल्ला केला अनिकेतच्या तेथे उपस्थित कुटुंबीयांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला चढवला असता अनिकेत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नार्थ प्रतिकार केला.

मात्र हल्लेखोरांच्या नातेवाईकांनी  हल्लेखोरांना तेथून पळून जाण्यास मदत केली.

या हल्ल्यातील पीडित अनिकेत पवार व त्यांचे कुटुंबीय कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले तेथून कांजूरमार्ग पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले, अनिकेत पवार यांना घेऊन त्यांचे दोन नातेवाईक भाड्याची रिक्षा करून विक्रोळी येथील सरकारी रुग्णालयात गेले असता त्यांनी प्रथमोपचार करून पीडित अनिकेत यास राजावाडी किंवा सायन हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन सी टी स्कॅन करून घेण्याचा सल्ला दिला.

तो पर्यंत पोलीस ठाण्यात दादा पिसाळ हे उपस्थित झाले आणि आरोपींच्या वतीने पीडित माहिलेंसमोर सारवासारव करू लागले.  मात्र पीडित महिलांनी पुन्हा आरोपींकडून कोणताही गुन्हा घडूनये म्हणून त्यांस कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे म्हणून तसेच आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एफ. आय. आर. होऊन माननीय न्यायालयाला विभागातील अशी परिस्थिती निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे असे सांगितले.

त्यांनतर हल्लेखोर राजरोसपणे आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी त्यास ताब्यात ही घेतले.

मात्र थोड्या वेळाने पोलिसांनी त्यांच्या गाडीत बसवून त्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर नेले. आणि येताना हल्लेखोर डोक्याला सम्पूर्ण बेंडेज गुंडाळून लंगडत आला.  आहे ना राजकारण्यांच्या पोलीस प्रशासनावरील अधिपत्त्याची कमाल?

पोलीस ठाण्यातील आणि तेथील आवारातील फुटेज वरून हे स्पष्ट होऊ शकते.

अनिकेत यास पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यांनतर अनिकेत याच्या वतीने एफ. आय. आर. दाखल करून घेतला गेला. त्यावेळेस अनिकेत आणि त्याचा पीडित मित्र याच्या व्यतिरिक्त कोणालाही पोलीस ठाण्यात उपस्थित राहू दिले नाही अगदी अनिकेत ची आई आणि काकी ज्यांना हल्ल्यात मारहाण  केली गेली त्यांनाही पोलीस ठाण्यातून बाहेर काढले गेले, मात्र माजी नगरसेवक दादा पिसाळ या राजकरण्याला पोलिसांनी पोलीस ठाण्यातच थांबवून ठेवले.

रात्री उशिरा पर्यंत अनिकेत यांची तक्रार लिहून घेतल्यावर, पोलीस ठाण्यात हल्लेखोर जयेश अनिल पुजारी यांनी सुद्धा स्वतःच्या वतीने  गुन्हा  नोंद करून घेतला  असे अनिकेतच्या मित्राकडून कळाले, सदर दाखल करून घेतलेल्या तक्रारींचे गुन्ह्याचे स्वरूप पोलिसांनी उघड केले नाही.

आज सकाळी १०. ४५ पर्यंत घटनास्थळावर कोणताही पंचनामा केला गेला नाही वा सविस्तर चौकशी  घटना स्थळी येऊन पोलिसांनी केली नाही असा अनिकेत यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

मात्र अनिकेत  यास जबर दुखापत होऊन देखील रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्या मूळे अनिकेत यांचे नातेवाईक आणि नागरिक यांच्या मनात सदर प्रकरणी पोलीस कारवाई बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

त्याच प्रमाणे सदर हल्लेखोर आणि त्याचे साथीदार भांडुप पूर्व येथील भांडूपेश्वर कुंडाच्या आसपास अमली पदार्थांचे सेवन करताना आढळतात असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे

Comments

Unknown said…
भारत हा देश सामने जनते चा है तसेच जनता गरीब आणि कोमल मनाचे है

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .