डॉ राजु राम ने जो काम अनाथ बच्चों के लिये किया है,उसके लिये हमारी मीडिया उनके समाज कार्य को सलाम करती है !!
आजचा दिवस माझ्यासाठी खूपच आनंदाचा आहे. रस्त्यावरील, रेल्वे स्टेशनवरील निराधार, गरीब, अनाथ मुलांची सेवा करीत असतांना वर्ष (ऑगस्ट 2000) मध्ये एकेवेळी ठाणे स्टेशनवर राहणारी मुलगी निराधार अनाथ मुलगी विद्यार्थी विमला आणि तिचा भाऊ रामकृष्णा (साहिल) यांना परिस्थितीतुन बाहेर काढले, सांभाळले शिक्षनासाठी वसतिगृहात टाकले, प्रत्येक महिना दोन महिन्यातून भेटायला जायचो, आवश्यक ते सर्व पुरावायचो. भाषा समजत नसल्याने शाळेत प्रवेश मिळत नव्हता. कसेबसे विक्रोळी शाळेत प्रवेश करून दिला. दहावीत, बारावीत शाळा मधूनच त्रासामुळे सोडली परत काउंसलिंग करून परत शिक्षण कसेबसे शिक्षण करायला लावले. आज तीच आमची दत्तक मुलगी बिमलाने B.Com केले नंतर M. Com शिक्षण पुर्ण केले. तिने परिस्थितीवर मात करून शिक्षकपूर्ण केले. नोकरीला लागली, नंतर भाऊ बहीण एकत्र राहू लागले आत्ता ते मोठे झाले होते माझी/आमची चिंता दूर झाली होती. आज तिचे लग्न झाले लग्नाला आम्ही दोघे उपस्थित राहिलो आणि आशीर्वाद शुभेच्छा दिल्या. लग्नात तिने सर्वांनां सांगितले आज मी जे काही आहे ते राजु अंकल (डॉ राजु राम) यांच्या मुळेच आहे.त्यांचे मी जीवन भर आभारी आहे. यावेळी मन खूप भरून आले होते, वाटले आयुष्यात मी पैश्याच्या मागे लागलो नाही तर मानवतेच्या कार्यासाठी प्रयत्नशील राहिलो त्याचेच हे फलित आहे. नुसते बेटी बचाओ बेटी पढाओ नारे देऊन होत नाही, फक्त पद घेत बसलो नाही तर या साठी गेली 25 वर्षे कार्य करत राहिलो. त्यासाठी सतत प्रयत्नशील, कार्यशीलही असावे लागते. (आजकाल लोक फक्त पद प्राप्तीसाठी वाट्टेल ते करतात, परंतु कार्य *"O" असते.*
धन्यवाद
आपला *डॉ राजु राम*🙏🏻💐
एक सामाजिक कार्यकर्ता जो गेली 25 वर्षे सामाजिक कार्यात अविरतरित्या कार्यरत आहे. आपला साथ व आशीर्वाद, सहकार्य असू द्या💐🙏
Comments